रविवारीही एसी लोकल धावणार दर निम्मे केल्याने प्रवाशांचा प्रतिसाद वाढला

रविवारीही एसी लोकल धावणार दर निम्मे केल्याने प्रवाशांचा प्रतिसाद वाढला

तिकीट दरात कपात केल्यानंतर प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेवून रविवारीही एसी लोकल धावणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याची सुरुवात रविवार (ता.१५) पासून करण्यात आली. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर एसी लोकल धावली.

वाढता प्रतिसाद पाहता प्रशासनाने एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वेवर फेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार आहे. तर प्रत्येक रविवारी एसी लोकल धावणार असून सार्वजनिक सुट्टय़ांच्या दिवशीही एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत असणार आहे. दर रविवारी १४ फेऱ्या वातानुकूलित लोकलच्या होतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. १४ मे पासून हार्बरवरीलही वातानुकूलित लोकल बंद करून त्याच्या १६ पैकी १२ फेऱ्या सीएसएमटी ते ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ, टिटवाळा या मुख्य मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. तर लवकरच पश्चिम रेल्वेवर फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.

एसी लोकलचे वेळापत्रक

कुर्ला ते सीएसएमटी- प. ४.४६ वा, स.९.५६ वा

कल्याण ते सीएसएमटी- स.७.५६ वा

डोंबिवली ते सीएसएमटी- प.४.५५ वा आणि दु.३.२४

कल्याण ते दादर- स.११.२२ वा

कल्याण ते सीएसएमटी- स.६.३२ आणि स.८.५४ वा

बदलापूर ते सीएसएमटी -दु.१.४८वा

सीएसएमटी ते कल्याण- प.५.२०वा.स.७.४३, स.१०.०४ आणि संध्या ६.३६ वा

दादर ते बदलापूर- दु १२.३० वा

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in