२९ कोटी रुपयांचा शैक्षणिक घोटाळा,माजी खजिनदाराला अटक

ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत २० ऑक्टोबर, २०२१ रोजी या प्रकरणाचा तपास सुरू केला
२९ कोटी रुपयांचा शैक्षणिक घोटाळा,माजी खजिनदाराला अटक

महाराष्ट्रातील सातारा येथील एका शैक्षणिक संस्थेच्या माजी खजिनदाराला चार वर्षांच्या कार्यकाळात २९ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या कथित आरोपाप्रकरणी शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली.

आप्पासाहेब देशमुख असे अटक आरोपीचे नाव असून २०११ ते २०१६ दरम्यान श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचा खजिनदार म्हणून काम पाहिले होते, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात सातारा येथील वडूल पोलीस ठाण्यात पहिल्यांदा तक्रार नोंदवण्यात आली होती. सोसायटीच्या व्यवस्थापनाने एमबीबीबीएस शाखेला प्रवेश मिळवून देण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले होते. मायनी येथील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी सोसायटीच्या व्यवस्थापनाने पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. मात्र हे महाविद्यालय एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी पात्र नसल्याचे नंतर तपासात आढळून आले. त्यानंतर ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत २० ऑक्टोबर, २०२१ रोजी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

तपासादरम्यान देशमुख यांनी जवळपास ३५०पेक्षा जास्त विद्यार्थ्यांकडून २९ कोटी रुपयांपर्यंतची रक्कम गोळा केली आणि त्याबदल्यात त्यांना एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेशही दिला गेला नाही, असे आढ‌ळून आले. देशमुख यांनी आपला भाऊ महादेव यांच्या संगनमताने हे कटकारस्थान रचण्यात आले. सध्या महादेव हे अटकेत असून हे पैसे रोखीच्या स्वरूपात स्वीकारण्यात आले होते. हे पैसे देशमुख यांच्या बँक खात्यासह त्यांच्या कुटुंबीयातील अन्य सदस्यांच्या बँक खात्यातही वळवण्यात आले होते, अशी माहिती ईडीच्या तपासात समोर आली आहे. त्यानंतर देशमुख यांना चौकशीसाठी बोलावून शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असून २४ जूनपर्यंत ईडीची कोठडी दिली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in