जहांगीर आर्ट गॅलरी येथे श्री गणेशाच्या विविध रूपांच्या कलाकृतींचे प्रदर्शन

अनेक कलाकार-चित्रकार आपल्या निरीक्षणातून, श्रद्धेतून जे काही अनुभवास येते ते चित्ररूपी साकारण्याचा प्रयत्न करतात.
जहांगीर आर्ट गॅलरी येथे श्री गणेशाच्या विविध रूपांच्या कलाकृतींचे प्रदर्शन

गणराय म्हणजे विद्येची, कलेची देवता. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना हवाहवासा असणारा गणराय आणि त्याचा उत्सव अवघ्या ३० दिवसांवर येऊन ठेपला आहे. देशभरात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे; परंतु चित्रकार नामदेव पाटील यांनी आपल्या कलेतून गणरायाला उत्सवापूर्वीच मानवंदना दिली आहे. पेस्टल, पेन्सिल, जलरंग अशा माध्यमांचा कल्पकतेने वापर करत गणेशाची विविध रूपे पाटील यांनी साकारली आहेत. मंगळवार, २ ऑगस्टपासून मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे श्री गणेशाच्या विविध रूपांच्या कलाकृतींचे प्रदर्शन रसिकांना पाहता येणार आहेत. ८ ऑगस्टपर्यंत सुरू राहणारे प्रदर्शन सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य पाहता येईल.

अनेक कलाकार-चित्रकार आपल्या निरीक्षणातून, श्रद्धेतून जे काही अनुभवास येते ते चित्ररूपी साकारण्याचा प्रयत्न करतात. कोणी निसर्गावर प्रेम करतो, तर कोणी विविध प्रांतातल्या जीवनशैलीवर. कोणी पक्षी-प्राण्यांवर, तर कोणी देव-देवतांवर. असेच एक चित्रकार नामदेव पाटील यांनी आपल्या कलेतून कायम गणरायाला मानवंदना दिली आहे. यंदाही त्यांचे गणेशाच्या विविध रूपांचे चित्रप्रदर्शन मुंबईतील काळा घोडा येथे २ ऑगस्ट ते ८ ऑगस्टपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. गणेशोत्सवाआधी रसिकांना खास करून गणेशभक्तांना या प्रदर्शनाद्वारे एक सुंदर अनुभव अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in