नाटकाचे प्रयोग, लोकनृत्य जोगेश्वरीत मालवणी जत्रा ;१० दिवसांच्या जत्रेत विविध कार्यक्रमांची रेलचेल

कोकणातून आलेल्या विविध दशावतार नाट्य मंडळांचे प्रयोग दरदिवशी जोगेश्वरीतील रसिक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.

मुंबई : नाटकाचे प्रयोग, लोकनृत्य जोगेश्वरीत मालवणी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. १० दिवसांच्या जत्रेत विविध कार्यक्रमांची रेलचेल दिसणार असून जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर ( ठाकरे पक्ष) यांच्या हस्ते १८ नोव्हेंबर रोजी जत्रेचा शुभारंभ सायंकाळी ७ वाजता करण्यात येणार आहे.

या जत्रेत विविध प्रकारच्या खेळण्याचा समावेश असल्याने त्याचा बच्चे मंडळींना मनमुराद आनंद लुटता येणार आहे. त्याचबरोबर कोकणी व मालवणी पदार्थांचे स्टाॅल्स व अन्य शाकाहारी व मांसाहारी खाद्य पदार्थांचे स्टाॅल्सही असणार आहेत. जत्रेच्या उद्घाटना दिवशीच मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी तर्फे गणेश कला मंच प्रस्तुत महाराष्ट्राचा लोकमेळा. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील लोकनृत्याचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. खास कोकणातून आलेल्या विविध दशावतार नाट्य मंडळांचे प्रयोग दरदिवशी जोगेश्वरीतील रसिक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.

जत्रेच्या समारोपादिवशी म्हणजेच २७ नोव्हेंबरला जोगेश्वरी भुषण पुरस्काराचे वितरण, घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ, जोगेश्वरीतील विजयी प्रो गोविंदा पथकाचा सन्मान सोहळा पार असणार आहे. सलग १० दिवस चालणाऱ्या या जत्रेचा जोगेश्वरी बरोबरच मुंबईतील कोकणी व मालवणी पदार्थाच्या खाद्य प्रेमींनी तसेच दशावतार नाटकांच्या रसिक प्रेक्षकांना या जत्रेचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in