कर्जतला चौघे बुडाले दोघांचे मृतदेह सापडले : एक सुखरूप, एक बेपत्ता

स्थानिक तरुणांनी यश साहू या वीस वर्षीय मुलाला पाण्याबाहेर काढले
कर्जतला चौघे बुडाले दोघांचे मृतदेह सापडले : एक सुखरूप, एक बेपत्ता
Published on

कर्जत : गणेश विसर्जनासाठी गेलेले चार जण उल्हास नदीत बुडाल्याची घटना कर्जत तालुक्यातील चांदई येथे घडली. यामध्ये एका १२ वर्षीय मुलाला त्याच्या वडिलांनी पाण्यात उडी मारून वाचविले, तर दोघांचे मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडले असून अद्याप एका तरुणाचा शोध सुरू आहे.

गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी कर्जत तालुक्यातील उकरूळ येथे चेतन सोनवणे (मूळचे सोलापूर) यांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पुणे येथील मित्र जगदीश साहू आणि त्यांचा मुलगा यश हे आले होते. बाप्पाला निरोप देण्यासाठी सोनावणे कुटुंब आणि त्यांचे मित्र नदीवर गेले.

या तिघांसह शेजारचा बारा वर्षीय मुलगा रोहन रंजन जीना पाण्यात उतरले. विसर्जन करताना पाण्याचा अंदाज न आल्याने चारही जण पाण्याच्या वाढत्या प्रवाहासोबत वाहून जात असताना रोहन रंजन या बारा वर्षीय मुलाला पाण्याबाहेर उभे असलेले त्याचे वडील रंजन जीना यांनी पाण्यात उडी मारून वाचविले. परंतु चेतन सोनावणे, जगदीश साहू आणि यश साहू हे तिघे पाण्यात बुडाले.

स्थानिक तरुणांनी यश साहू या वीस वर्षीय मुलाला पाण्याबाहेर काढले, पण त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. चेतन सोनवणे आणि जगदीश साहू यांचा पत्ता लागला नाही. जगदीश साहू यांचा मृतदेह शुक्रवारी दुपारी सापडला.

logo
marathi.freepressjournal.in