विजेतेपदाच्या लढाईसाठी चार संघ झाले निश्चित

विजेतेपदाच्या लढाईसाठी चार संघ झाले निश्चित

आयपीएल २०२२ च्या प्ले ऑफ फेरीचे चार संघ आता निश्चित झाले असून गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदाची लढत होणार आहे. लीग टप्प्यातील ६९ सामन्यांनंतर विजेतेपदाच्या लढाईसाठी चार संघ निश्चित झाले आहेत.

पहिला क्वालिफायर सामना लीग स्टेजच्या पॉइंट टेबलमधील टॉप दोन मधील संघांमध्ये खेळवला जाईल. साखळी फेरीत गुजरात टायटन्सचा संघ पहिल्या तर राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांमधील हा सामना २४ मे रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल आणि या सामन्यातील पराभूत संघाला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी मिळेल. लीग टप्प्यातील गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळवला जाणार आहे. हा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होईल. दोन्ही संघांमधील हा सामना २५ मे रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ दुसरा क्वालिफायर सामना खेळेल. यातील विजेत्या संघाला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील पहिला क्वालिफायर सामना गमावलेल्या संघाचा सामना करावा लागेल. या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाचे आव्हान संपुष्टात येईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in