
मुंबई : एसआरए इमारतीमध्ये असलेल्या दोन फ्लॅटसाठी ४७ लाख रुपयांचा अपहार करुन फसवणूक केल्याप्रकरणी एका आरोपीस आठ महिन्यानंतर अटक करण्यात कुरार पोलिसांना यश आले आहे. वैभव वासुदेव पिसे असे या आरोपीचे नाव असून, फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत त्याच्यासोबत अमीत धोंडू येलवे आणि गणेश गुप्ता नावाचे दोनजण सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. मालाड येथे तक्रारदार महिला राहत असून, तिथे राहणाऱ्या गणेशशी तिची ओळख होती. गणेशने तिला एसआरएमध्ये एक फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. अमीत येलवे याचा मालाड येथील एसआरएमध्ये दोन फ्लॅट असून, त्याला या फ्लॅटची विक्री करायची आहे, असे सांगून त्याने तिची अमीतशी ओळख करून दिली होती. फ्लॅटची पाहणी केल्यांनतर तिने त्याचा फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांच्यात २६ लाख ५० हजार रुपयांमध्ये फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा सौदा झाला होता. या दोन्ही फ्लॅटसाठी तिने त्यांना २३ लाख ५० हजार रुपये दिले होते.