खाद्यतेलाच्या पाऊच आणि डब्यांमधून पामतेलाची विक्री करून फसवणूक

 खाद्यतेलाच्या पाऊच आणि डब्यांमधून पामतेलाची विक्री करून फसवणूक

विविध कंपन्यांच्या पाऊच आणि डब्यांमधून पामतेलाची विक्री करून फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना कांदिवली येथून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. सागर नंदलाल झव्हेरी आणि रामअवध इंद्रजीत गौड अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने शनिवार २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत मनिष करसन डांगर याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा शोध सुरू आहे.

या कारवाईत पोलिसांनी ३९ लाख २४ हजार रुपयांच्या २४ हजार १५० लिटर खाद्यतेलासह फोरवेल सनफ्लॉवर ऑईलचे एक लिटरचे पंधरा पाऊच असलेले ८२ बॉक्स, फोरवेल सनफ्लॉवर ऑईलचे ७५० ग्रॅमचे १५ पाऊच असलेले २४६ बॉक्स, श्री किशन मस्टड्र ऑर्डलचे ८७ बॉक्स, राजदीप ग्राऊंडनट ऑर्डलचे ३२ बॉक्स, कोणतेही नाव असलेला १५ किलोचे २०३ स्टिल डब्बे, किशन कस्टर्ड एक्सपेलर ऑईलचे, चार डब्बे, सनफ्राय ऑईलचे १५ किलो वजनाचा एक स्टिल डब्बा आणि सनी स्टिलचे दोन डब्बे, राधा रिफाईन राईसब्रेन ऑईलचे २ डब्बे असा १८ लाख ३४ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

कांदिवली परिसरात काहीजण विविध कंपन्याच्या पिशव्यांसह डब्ब्यामध्ये पामतेल भरून या तेलाची विक्री करून सर्वसामान्यांची फसवणूक करत असल्याची माहिती घाटकोपर युनिटच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी कांदिवलीतील आकुर्ली रोड, बालाजी इंडस्ट्रियल इस्टेटच्या हरिओम ट्रेडिंगच्या गाला क्रमांक सी-४७ मध्ये छापा टाकला असता तिथे सागर झव्हेरी आणि रामअवध गौड हे खाद्यतेलाच्या विविध कंपन्यांच्या पाऊच आणि डब्यांमध्ये पामतेल पॅकिंग करत असल्याचे दिसून आले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in