स्वस्तात कार देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची फसवणुक

स्वस्तात कार मिळत असल्याने त्यांनी दोन्ही कार विकत घेण्याची तयारी दर्शविली होती.
स्वस्तात कार देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची फसवणुक

मुंबई : स्वस्तात कार देण्याचे आमिष दाखवून एका कार डीलर व्यावसायिकाची साडेपाच लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अमित संजय वारिक या आरोपीला चारकोप पोलिसांनी अटक केली. गुन्हा दाखल होताच अमित पळून गेला होता. अखेर त्याला चार महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले असून याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार बोरिवलीतील गोराई परिसरात राहत असून त्यांचा जुन्या कार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. याच व्यवसायातून ओळखी झाल्यानंतर अमितने काही दिवसांपूर्वी त्यांना पाच लाखांमध्ये दोन इनोव्हा कार देतो, असे सांगितले होते. स्वस्तात कार मिळत असल्याने त्यांनी दोन्ही कार विकत घेण्याची तयारी दर्शविली होती. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने दोन्ही कारचा ताबा न देता त्यांनी दिलेल्या पैशांचा अपहार करून पलायन केले होते. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी अमित वारिकविरुद्ध चारकोप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in