गणेश मूर्ती कुठली शाडूची की पीओपीची विसर्जनस्थळी होणार मूर्तींची तपासणी खड्डे बुजवा अन्यथा पुढील वर्षी परवानगी नाही; सार्वजनिक मंडळांना पालिकेचा इशारा

शाडूच्या मातीची मूर्ती साकारणाऱ्या मूर्तिकारांना ४६ ठिकाणी जागा ही उपलब्ध करून देण्यात आली आहे
गणेश मूर्ती कुठली शाडूची की पीओपीची विसर्जनस्थळी होणार मूर्तींची तपासणी खड्डे बुजवा अन्यथा पुढील वर्षी परवानगी नाही; सार्वजनिक मंडळांना पालिकेचा इशारा

मुंबई : पीओपीच्या गणेश मूर्तींवर टप्याटप्याने बंदी घालण्याचे प्रयत्न सुरू असून, यंदा साकारण्यात आलेल्या मूर्ती पीओपी की शाडूच्या मातीच्या याची विसर्जनस्थळी तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त गणेशोत्सव समन्वयक रमाकांत बिरादार यांनी सांगितले. दरम्यान, मंडप परिसरातील खड्डे न बुजवल्यास पुढील वर्षी परवानगी देणार नाही, असा इशारा मुंबई महापालिका प्रशासनाने दिला आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पीओपीच्या गणेश मूर्तींमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता असून, समुद्र जीव धोक्यात येतात. त्यामुळे शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीं साकाराव्यात याव्यात, असे आवाहन गणेश मूर्तिकारांना पालिका प्रशासनाने केले आहे.

पालिकेकडून मूर्तिकारांना ३५० मेट्रिक टन शाडूची माती

विभागस्तरावर शाडूच्या मातीची मूर्ती साकारणाऱ्या मूर्तिकारांना ४६ ठिकाणी जागा ही उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु एक शाडूची मातीची मूर्ती साकारण्यासाठी १५ ते २० किलो शाडूची माती लागते. शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती साकारण्यासाठी ३५० मेट्रिक टन शाडूची माती उपलब्ध करून देण्यात आली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी शाडूच्या मातीची मूर्ती साकारावी, असे आवाहन केले असून, विसर्जन स्थळी मूर्ती नेमकी कशाची याची तपासणी करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन पार पडले असले, तरी याची एकत्रित आकडेवारी १० दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन पार पडल्यानंतर उपलब्ध होईल, असे रमाकांत बिरादार यांनी सांगितले.

मूर्तीची विल्हेवाट लावण्यासाठी संशोधन करणार!

मुंबई महापालिकेने गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी २०० कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. एका गणेश मूर्तीतून १५ ते २० टन माती जमा होते. जमा होणाऱ्या मातीची योग्यरित्या विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग संशोधन करत असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in