गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्या!अदानी इलेक्ट्रिसिटीचे आवाहन

मुंबईतील ९०० हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांना अखंड वीज पुरवठा करून एक उल्लेखनीय कामगिरी आम्ही करणार आहोत
गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्या!अदानी इलेक्ट्रिसिटीचे आवाहन

मुंबई : दरवर्षी गणेशोत्सव मुंबई शहरात तसेच संपूर्ण राज्यात सामूहिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. अदानी इलेक्ट्रिसिटी लाडक्या देवताचे म्हणजेच गणेशाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन अदानी इलेक्ट्रिसिटीने केले आहे.

अदाणी इलेक्ट्रिसिटी हे अर्ज प्राप्त झाल्यापासून ४८ तासांच्या आत गणेश मंडपांसाठी अनुदानित निवासी दर देणार आहेत. गणेश मंडळे वीज जोडणीसाठी आवश्यक अर्ज सादर करण्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटीच्या संकतेस्थळाला किंवा अन्य सहाय्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटीच्या नजीकच्या कार्यालयाला भेट देऊ शकतात.

गणेश मंडपांना तात्पुरती वीज जोडणी देण्याबाबत अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडचे प्रवक्ते म्हणाले, “संपूर्ण मुंबई शहर हे यंदाच्या गणेशोत्सवासाठी सज्ज असताना अखंडित वीज पुरवठ्याची निकड आम्ही जाणून आहोत. मुंबईतील ९०० हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांना अखंड वीज पुरवठा करून एक उल्लेखनीय कामगिरी आम्ही करणार आहोत. ही वीज जोडणी अत्यंत जलदपणे पुरविण्यासाठी आणि वीज पुरवठ्याची विश्वासार्हता राखण्यासाठी आमच्या परिचलन पथकाने पूर्णपणे तयारी केली आहे. गणेश मंडळांकडून अर्ज प्राप्त होण्याच्या ४८ तासात वीज पुरवठा सुरळीत होईल, याची खात्री देत आहोत.”

“आमचा समर्पित असा जलद प्रतिसाद चमू हा गणेश मंडप आणि भक्तांच्या सुरक्षिततेसाठी आणि विश्वासार्हतेसाठी त्वरित प्रतिसाद आणि पुनर्पुरवठा योजनेसह या वर्षीही सज्ज आहे. ८० हून अधिक गणेशमूर्ती विसर्जनस्थळी आम्ही फ्लडलाइटसह रोषणाईदेखील यादरम्यान उपलब्ध करून देऊ गणेश मंडपाला भेट देणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी अधिकृत परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडूनच वीज जोडणीचे काम करून घ्यावे,” असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in