औषधांच्या दुकानात कोडेन सिरप विक्री करणारी टोळी अटकेत

कोडेन सिरपच्या बाटल्या जप्त केल्या असून यातील काही औषधे उत्तर प्रदेशमार्गे पुणे आणि मुंबईत आणण्यात आली होती.
औषधांच्या दुकानात कोडेन सिरप विक्री करणारी टोळी अटकेत

औषधांच्या दुकानात कोडेन सिरप विक्री करणाऱ्या एका टोळीचा नाराकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. अरबशहा शहानवाज सय्यद, नजरे आलम सलमान, संदीप ज्ञानेश्‍वर खेडेकर, नितीन अशोक भोसले व अन्य एका आरोपीचा समावेश आहे. अटकेनंतर या आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना एनसीबी कोठडी सुनावली आहे. या पाचही आरोपींकडून या अधिकाऱ्यांनी सुमारे ५० लाख रुपयांच्या १३ हजार २३८ कोडेन सिरपच्या बाटल्या जप्त केल्या असून यातील काही औषधे उत्तर प्रदेशमार्गे पुणे आणि मुंबईत आणण्यात आली होती.

या आरोपींच्या अटकेनंतर काही औषधविक्रेते एनसीबीच्या रडारवर असल्याचे सांगण्यात आले. नशेसाठी स्वस्त समजल्या जाणाऱ्या कोडेन सिरपची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. उत्तर प्रदेशातून आणलेला कोडेन सिरपचा साठा पुणे आणि मुंबईत पाठविला जातो. त्यानंतर हा साठा अंधेरी येथे ठेवला जात असून, नंतर तो काही औषधविक्रेत्यांना विकला जात असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकाऱ्यांनी अंधेरीतील एमआयडीसी परिसरातून दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १ हजार १५२ कोडेन सिरपच्या बाटल्या जप्त केल्या होत्या.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in