२०२४च्या निवडणुकीसाठी सज्ज राहा, आपल्याला पुन्हा एकदा लढायचंय - उद्धव ठाकरे

संघर्षाची तयारी ठेवा, सगळ्यांना पुन्हा एकदा लढायचे आहे
२०२४च्या  निवडणुकीसाठी सज्ज राहा, आपल्याला पुन्हा एकदा लढायचंय - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व माजी आमदारांची बैठक मंगळवारी दुपारी १ वाजता मातोश्रीवर बोलावली होती. माजी आमदार शिंदे गटात जाऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी माजी आमदारांशी संवाद साधला. २०२४च्या निवडणुकीसाठी सज्ज राहा, आपल्याला पुन्हा एकदा लढायचंय, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केले.

“संघर्षाची तयारी ठेवा, सगळ्यांना पुन्हा एकदा लढायचे आहे. आता आपली वारंवार बैठक होणार आहे आणि तुमचे मूळ प्रश्न आम्ही सोडवणार आहोत,” असे उद्धव ठाकरे माजी आमदारांना म्हणाले.

शिवसेनेचे पदाधिकारी आपल्या गटात कसे येतील, यासाठी शिंदे गटाने फिल्डिंग लावली आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरेंनीही बैठकींचा सपाटा लावला आहे. एकंदरीतच ४० आमदार फुटल्याने हे नुकसान भरून काढण्यासाठी शिवसेनेने पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी माजी आमदारांना विश्वास दिला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in