
मुंबई : कुर्ला पश्चिम येथील भारत सिनेमाजवळील एका घराचा भाग कोसळला. या दुर्घटनेत वैष्णवी प्रजापती (१८) या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सुभाष नगर, शिव मंदिर, भारत सिनेमाजवळील सुमेरा या तळ अधिक दोन मजली इमारतीचा भाग सोमवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत वैष्णवी प्रजापती जखमी झाली असता, तिला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी तिचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.