रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ; पश्चिम रेल्वेवरील १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी, बोरिवली, भाईंदर, मीरा रोड, विरारसारख्या स्थानकांत प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी गर्दीतील प्रवास जीवघेणाच बनत आहे
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ; पश्चिम रेल्वेवरील १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ
ANI

पश्चिम रेल्वे मार्गावर लवकरच १५ डबा लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे. पश्चिम रेल्वेकडून याबाबत नियोजन सुरु असून एकूण आणखी २७ फेऱ्यांची भर पडणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार, डहाणूपर्यंत १५ डबा लोकल सेवा होतात. या सेवांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असतो. या सेवेचा विस्तारही पश्चिम रेल्वेने केला. पश्चिम रेल्वेच्या अंधेरी, बोरिवली, भाईंदर, मीरा रोड, विरारसारख्या स्थानकांत प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी गर्दीतील प्रवास जीवघेणाच बनत आहे. हा प्रवास सुकर करण्यासाठी अंधेरी ते विरारदरम्यान धिम्या मार्गावरही १५ डबा लोकल चालविण्याचे नियोजन करण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in