आषाढी एकादशी निमित्त वारकरी बांधवांसाठी खुशखबर

पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या सोयी सुविधांबाबत तसेच वारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेतला
आषाढी एकादशी निमित्त वारकरी बांधवांसाठी खुशखबर

वारकरी हा केंद्रबिंदू मानून काम करा. ही वारी, आषाढी वारकऱ्यांची आहे. त्यांच्यासाठी सर्व त्या सोयी सुविधा द्या. कोणत्याही परिस्थितीत त्यांची गैरसोय होऊ नये याकडे लक्ष द्या. अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची पंढरपूर वारी यात्रेसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्याचसोबत आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या वाहनांना टोल माफ करण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी केली.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या सोयी सुविधांबाबत तसेच वारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणिपुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती होती. यावर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी वारीमध्ये सहभागी होतील. यावर्षी पंढरपूरात गर्दी वाढेल. चंद्रभागेत स्नानासाठीची व्यवस्था चोख व्हावी. याठिकाणी चांगली स्वच्छता, त्यासाठी आवश्यक गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. काठावरील निर्माल्य कलशाची संख्या वाढवा.ते वेळोवेळी रिकामी होतील, अशी व्यवस्था करा. शौचालयांची स्वच्छता महत्त्वाची आहे. त्यासाठी कर्मचारी चोवीस तास सज्ज राहावेत. त्यांना आवश्यक अशी स्वच्छतेचे उपकरणे, सामुग्री उपलब्ध करून द्या. कपडे बदलण्यासाठीच्या निवारा व्यवस्थेत वाढ करा. रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी गरज पडल्यास खासगी यंत्रणाचा सहभाग घ्यावा. दैनंदिन साफसफाई यासाठी आजुबाजूला असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या खासगी यंत्रणाचा सहभाग घ्यावा. मोठा पाऊस झाला तर पाणी साचू नये यासाठी व्यवस्था करा, त्यासाठी पंपाचा वापर करा. आरोग्य सुविधा औषधे, फवारणी तसेच तापाची, साथीच्या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा यांची आतापासूनच व्यवस्था करा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in