
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) हे भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर असून जेएनपीएने शुक्रवारी मुंबईत भारतीय उद्योग महासंघ च्या सहकार्याने 'जेएनपीए-एसईझेड इन्व्हेस्टर कॉन्क्लेव्ह २०२२' चे आयोजन केले होते. गुंतवणूकदारांना भविष्यातील विकासामध्ये गुंतवणुक करण्यासाठी व देशाच्या वाढत्या बंदर-उद्योग आधारित अर्थव्यवस्थेचा एक भाग होण्यासाठी गुंतवणूकदारांना भरपूर संधी उपलब्ध देण्याच्या उद्देशाने या कॉन्क्लेव्होचे आयोजन करण्यात आले होते.
बंदर आधारित औद्योगिकीकरणाच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने, जेएनपीएने हा बहु-उत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) प्रकल्प २७७.३८ हेक्टर फ्रीहोल्ड जमिनीवर विकसित केला आहे. अशाप्रकारचे हे औद्योगिक केंद्र भारतातील पहिले बंदर-आधारित बहु-उत्पादन कार्यरत विशेष आर्थिक क्षेत्र आहे. या विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये गुंतवणूकीच्या विविध संधी व जागतिक दर्जाची वैशिष्ट्ये अधोरेखित करताना जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले, या विशिष्ट प्रकल्पासह बंदर-आधारित व्यवसाया वाढीच्या पैलूंना अधिक बळकट करण्यासाठी सज्ज आहे.