
मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करण्याच्या ‘मनसे’च्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारत प्रतिबंधात्मक कारवाईला प्रारंभ केला. मात्र, या कारवाईनंतरही मशिदींसमोर भोंगे लावण्याच्या निर्णयावर मनसे प्रमुख राज ठाकरे ठाम असून ज्या मशिदींवरील भोंगे उतरविण्यात आलेले नाहीत तेथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवाजाच्या मर्यादेतच हनुमान चालिसाचे भोंगे लावावेत, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्याचबरोबर ज्या मशिदींमधून भोंगे वाजवले जातील, त्याठिकाणी तातडीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती द्यावी, असेही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनात म्हटले आहे.
मनसेचे आंदोलन ३ मे रोजी होणार होते. मात्र, मुस्लीम धर्मियांचा ईदचा पवित्र सण असल्याने आंदोलन रहित करून पुढील तारीख देण्याचे जाहीर केले गेले. आंदोलनासंदर्भात मंगळवारी ट्विट करुन माहिती देण्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी त्यांनी तीन पानी पत्र ट्विट करून माहिती दिली