कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना कसे रोखावे ?

नवीन भरती केल्यानंतरही बऱ्याचदा नोकरी सोडण्याचे कारण हे संस्थेची संस्कृती आत्मसात करण्यातील अक्षमता असू शकते
कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना कसे रोखावे ?

संस्था वा कंपन्यांमधील मनुष्यबळ विभागाच्या मनुष्यबळ प्रमुखांसमोर कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता कशी सुनिश्चित करायची या आव्हानाला नेहमीच तोंड द्यावे लागते. त्याची दोन महत्त्वाची कारणे म्हणजे सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना कसे रोखवे आणि त्यांच्या कार्यक्षमता पातळीत वाढ करणे. कामाच्या ठिकाणची कार्यक्षमता सुधारण्यासाठी मनुष्यबळ विभागाला कर्मचारी टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांची कामगिरी अधिक वाढविण्यासाठी कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता सुनिश्चित करावी लागेल.

नवीन भरती केल्यानंतरही बऱ्याचदा नोकरी सोडण्याचे कारण हे संस्थेची संस्कृती आत्मसात करण्यातील अक्षमता असू शकते. त्यामुळे नवीन भरती झालेल्यांना कामाच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो. कामातील कामगिरी झटपट दाखवण्यासाठीच्या अवाजवी दबावामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निराशा येऊ शकते. अनुभवी कर्मचारी आपला मनुष्यबळ विभाग आणि कामकाज प्रमुखांशी स्पष्ट आणि मनमोकळी चर्चा करून आपल्यातील मतभेद, गैरसमज कमी करू शकतात.

कर्मचारी नेहमीच ऎकून आणि समजावून घेण्यास महत्व देत असल्याने संबंधित विभागालाही कर्मचाऱ्यांमधील मतभेद, गैरसमज शांततेत दूर करता येतात. संस्थात्मक नैतिकता आणि तत्त्वज्ञान हे आणखी एक घटक आहे जे कर्मचाऱ्यांच्या गळतीवर परिणाम करतात. जेव्हा कर्मचाऱ्यांना वाटते की, संस्था त्यांच्या योगदानाची कदर करते, तेव्हा ते त्यांच्या योगदानात अधिकाधिक मुल्याधिष्टता आणण्याचा प्रयत्न करतात. चांगल्या कामासाठी ‘पाठीवर थाप मारणे’देखील कर्मचाऱ्याचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्याला सर्वोत्तम योगदान देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दीर्घकाळात उपयोगी ठरू शकते. कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, याची खात्री करणे हे आणखी एक आव्हान आहे. प्रत्येक व्यक्तीची संभाव्य ताकद ओळखण्यास आणि संस्थेच्या फायद्यासाठी त्याचा उपयोग करण्यास कामकाज व्यवस्थापक सक्षम असणे आवश्यक आहे. तांत्रिक आणि मृदूकौशल्य वाढवण्याचे प्रशिक्षण कार्यक्षमता पातळी उंचावण्यास मदत करू शकते.

कौशल्य वाढवण्यासाठी सुयोग्य प्रशिक्षण कार्यशाळा कार्यक्षमता सुधारण्यास आणि एखाद्या व्यक्तीमधील कोणत्याही क्षमतेतील अंतर भरून काढण्यास मदत करू शकतात. त्याचप्रमाणे, कर्मचाऱ्यांच्या कौशल्याला न्याय देणाऱ्या विभागात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणेदेखील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. मतभेद, गैरसमज निर्माण करणाऱ्या घटकांचे वेळेवर निवारण कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारे कार्य करण्यास प्रेरित करते आणि कर्मचारी सोडून जाण्याचे प्रमाण कमी होते ज्यामुळे कामकाजाच्या ठिकाणी कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in