दोन कोटी रुपयांच्या फ्लॅटसाठी पतीने केला पत्नीचा छळ

दोन कोटी रुपयांच्या फ्लॅटसाठी पतीने केला  पत्नीचा छळ

दोन कोटी रुपयांच्या फ्लॅटसाठी पतीने आणि त्याच्या कुटुंबियांनी पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा प्रकार गावदेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुटुंबातील चौघांविरुद्ध गावदेवी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. आरोपींमध्ये महिलेचा पती जिमीत ओकराज संघवी, सासू अंजना ओकराज संघवी, दिर प्रिस्ट ओकराज संघवी आणि नणंद किंजल जयेश मेहता यांचा समावेश आहे.

तक्रारदार महिला गावदेवी येथे राहत असून तिच्या वडिलांचा स्टिलचा व्यवसाय आहे. २० नोव्हेंबर २०२१ तिचे जिमीत संघवी याच्याशी विवाह झाला होता. विवाहाच्या वेळेस तिच्या पतीने तिला सुमारे ४४ लाख रुपयांचे दागिने दिले होते. लग्नापूर्वी तिचे वजन जास्त असल्याने तिचा पती तिला इच्छा नसताना नियमित व्यायाम करण्यास लावून कमी जेवण देऊन तिला मानसिक त्रास देत होते. वजनावरुन तिला सतत टोमणे मारले जात होते. विवाहाच्या वेळेस मनासारखा हुंडा मिळाला म्हणून तिचा पती, सासू, दिर आणि नणंद तिचा मानसिक व शारीरिक शोषण करीत होते. अनेकदा तिचा पती तिला मारहाण करीत होता. तिने फ्लॅटसाठी दोन कोटी आणावेत म्हणून ते तिच्यावर दबाव आणत होते. फ्लॅटवरुन नंतर तिला टोमणे मारण्यास सुरुवात झाली होती. फ्लॅटसाठी पैसे मिळणार नसले तर तिने तिथे राहू नये. तिने राहण्याचा प्रयत्न केल्यास तिला त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली होती. १८ मेला त्यांनी तिला घरातून हाकलून दिले होते. माहेरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर या चौघांविरुद्ध हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक शोषण करुन मारहण करणे, जिवे मारण्याची धमकी देणे आदी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in