‘‘उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात उभे राहतील, तेथे मी उभी राहून जिंकून दाखवेन’’ :नवनीत राणा

‘‘उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात उभे राहतील, तेथे मी उभी राहून जिंकून दाखवेन’’ :नवनीत राणा

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा खुले आव्हान दिले आहे. ‘‘उद्धव ठाकरे, तुमच्यात दम असेल तर लोकांमध्ये या आणि निवडून येऊन दाखवा,’’ असे आव्हान देत ‘‘उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात उभे राहतील, तेथे मी उभी राहून जिंकून दाखवेन,’’ असा विश्वास व्यक्त केला.

गुरुवारी (५ मे) भायखळा येथील तुरुंगातून सुटका झाल्यानंतर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या खासदार नवनीत राणा यांना रविवारी घरी सोडण्यात आले. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. नवनीत राणा लीलावती रुग्णालयातून हातात हनुमान चालीसाची पुस्तिका घेऊनच बाहेर पडल्या. ‘‘उद्धव ठाकरे राज्यातील ज्या जिल्ह्यात उभे राहतील, तिथे मी उभी राहून त्यांच्याविरोधात जिंकून दाखवते,’’ असे नवनीत राणा यावेळी म्हणाल्या. ‘‘दोन पिढ्यांपासून मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडे आहे; मात्र येणाऱ्या काळात मुंबईची जनता आणि रामभक्त त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. मी पूर्ण ताकदीने मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेविरोधात प्रचार करणार आहे. शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराची लंका तयार केली आहे. ती दहन केल्याशिवाय गप्प बसणार नाही,” असेही राणा यांनी म्हटले आहे.

‘‘माझा ठाकरे सरकारला सवाल आहे की, मी अशी काय चूक केली आहे? की, त्याची मला शिक्षा देण्यात आली. हनुमान चालीसाचे पठण करणे गुन्हा असेल आणि त्यासाठी १४ दिवसांची शिक्षा ठाकरे सरकारने दिली. त्यांनी मला १४ दिवस नाही तर १४ वर्षे शिक्षा दिली तरीही मी भोगायला तयार आहे.’’ असेही नवनीत राणांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.