... पण, कुणी कायदा हातात घेतला तर ते खपवून घेतले जाणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा दिला की नाही ते माहित नाही. आव्हाड यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही हे पोलीस तपासामध्ये स्पष्ट होईल.
... पण, कुणी कायदा हातात घेतला तर ते खपवून घेतले जाणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा दिला की नाही ते माहित नाही. आव्हाड यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही हे पोलीस तपासामध्ये स्पष्ट होईल. त्यानंतर पोलीस योग्य निर्णय घेतील. पण, त्यांच्यावर कारवाई करावी असा पोलिसांवर कोणताही राजकीय दबाब नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

कोण कुठल्या पक्षात आहे म्हणून त्यांच्यावर राजकीय भावनेने कारवाई करणार नाही, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, आमचे राज्य हे कायद्याचे राज्य आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करणे ठीक आहे. पण, कुणी कायदा हातात घेतला तर ते खपवून घेतले जाणार नाही.  आव्हाड यांच्याविरोधात जी तक्रार दाखल झाली त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस योग्य पद्धतीने तपास करतील त्यांच्यावर कोणताही दबाव नाही. ते नियमाप्रमाणे जी काही तक्रार आहे त्याची चौकशी करतील. तसेच, पोलीस तपासामध्ये पारदर्शकता असेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

हा अतिशय भ्याड प्रकार - अजित पवार

लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड प्रकार असून सरकारनेहा गुन्हा मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर २४ तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठीत म्हण आहे 'चार दिवस सासूचे तसेच चार दिवससुनेचे' असतात हीपण गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यावी असा स्पष्ट इशाराही अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in