बेकायदा फेरीवाल्यांच्या मुसक्या आवळल्या २१ हजारांहून अधिक फेरीवाल्यांना अटक; मध्य रेल्वेच्या फेरीवाला पथकाची अँक्शन

मध्य रेल्वेच्या फेरीवाला विरोधी पथकाने केलेल्या कारवाईतून दोन कोटी ७२ लाखांचा दंड वसूल केल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बेकायदा फेरीवाल्यांच्या मुसक्या आवळल्या
२१ हजारांहून अधिक फेरीवाल्यांना अटक; मध्य रेल्वेच्या फेरीवाला पथकाची अँक्शन

मुंबई : रेल्वे हद्दीत व लांब पल्ल्याच्या गाड्या मध्ये बेकायदा फेरीवाल्यांविरोधात मध्य रेल्वेच्या फेरीवाला विरोधी पथकाने एप्रिल ते ऑक्टोबर या सहा महिन्यांत तब्बल २१ हजार ७४९ फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल केला आहे, तर यापैकी तब्बल २१ हजार ७३६ फेरीवाल्यांना अटक करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या फेरीवाला विरोधी पथकाने केलेल्या कारवाईतून दोन कोटी ७२ लाखांचा दंड वसूल केल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मध्य रेल्वे मार्गावर दररोज ५० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. मध्य रेल्वेतील रेल्वे संरक्षण दलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वेच्या आवारात अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध यशस्वी मोहीम राबवली आणि ट्रेनमध्ये २१,७४९ प्रकरणे नोंदवून २१,७३६ व्यक्तिंना अटक केली.

दोन कोटी ७२ लाखांचा दंड वसूल

भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४४ अंतर्गत एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत फेरीवालाविरोधी पथकाने विविध कारवाया आणि तपासणी करून २१,७४९ गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये २१,७३६ व्यक्तिंना अटक केली. तर २.७२ कोटी दंड वसूल केला. एप्रिल-ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नोंदवलेल्या हॉकिंग प्रकरणांची संख्या गेल्या वर्षीच्या म्हणजेच एप्रिल-ऑक्टोबर २०२२ या कालावधीत नोंदवण्यात आलेल्या १७९६७ प्रकरणांच्या तुलनेत २१ टक्के अधिक आहे.

एप्रिल ते ऑक्टोबर अशी झाली कारवाई!

- एकट्या मुंबई विभागात ८,६२९ गुन्ह्यांची नोंद झाली असून ८,६२४ व्यक्तिंना अटक करून एकूण ९४.७७ लाख दंड वसूल करण्यात आला आहे.

-भुसावळ विभागाने सर्वाधिक १.१५ कोटींचा दंड वसूल केला. या विभागामध्ये ६,३४९ प्रकरणे नोंदवण्यात आली असून, ६,३४८ व्यक्तिंना अटक करण्यात आली आहे.

- नागपूर विभागात २,७३४ गुन्हे दाखल करून २,७३१ व्यक्तिंना अटक केली आणि २७.६१ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

-पुणे विभागाच्या रेल्वे संरक्षण दलाने १,८५६ गुन्हे नोंदवले, १,८५५ व्यक्तिंना अटक केली आणि १२.७१ लाख दंड वसूल केला.

- रेल्वे संरक्षण दलाने सोलापूर विभागात २,१८१ गुन्हे नोंदवले, २,१७८ व्यक्तिंना अटक केली आणि २१.९२ लाखांचा दंड वसूल

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in