भक्तिमय वातावरणात सहा दिवसांच्या बाप्पासह गौरींचे विसर्जन

लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी गणेशभक्तांची दोन महिने आधीच लगबग सुरू होते.
भक्तिमय वातावरणात सहा दिवसांच्या बाप्पासह गौरींचे विसर्जन

ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाचे आगमन झाले आणि गुरुवारी दीड दिवस, तर रविवारी पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. तर सोमवारी सहा दिवसांच्या बाप्पासह गौरींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ३,३०५ गणेशमूर्ती व गौरींचे नैसर्गिक व कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.

लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी गणेशभक्तांची दोन महिने आधीच लगबग सुरू होते. ३१ ऑगस्ट गणेश चतुर्थी या दिवशी लाडक्या बाप्पाची सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घराघरात बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. बुधवार, ३१ ऑगस्ट रोजी विराजमान झालेल्या दीड दिवसांच्या बाप्पाच्या गणेशमूर्तींचे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरयाचा जयजयकार करत गुरुवारी विसर्जन करण्यात आले. तर शनिवारी घराघरांत गौरी स्थापन करण्यात आली. रविवारी पाच दिवसांच्या बाप्पाला आनंदाश्रूत निरोप देण्यात आला. सोमवारी सहा दिवसांच्या बाप्पासह गौरींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in