
मुंबई : कर चुकवेगिरी केल्याप्रकरणी मद्य निर्मितीतील सोम समूहाच्या विविध शहरातील ४५ कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली.
सोम डिस्टलरीज ॲॅण्ड ब्रेवरीजेसच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, मुंबई, दिल्ली व कर्नाटकातील कार्यालय तसेच कंपनीचे प्रवर्तक जगदीश अरोरा यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली. तसेच या समूहात परदेशी निधी गुंतवण्यात आला होता. तसेच या कंपनीत ‘बेनामी’ संचालक नेमण्यात आले. कर चुकवेगिरी करण्यासाठी समूहाच्या कंपनीतून पैसे फिरवण्यात आल्याचा प्रस्ताव आहे.
सोम समूहाचे उत्पादन, बॉटलिंग व वितरण बहुतांशी छत्तीसगड व मध्य प्रदेशात होते. सध्या मध्य प्रदेशात निवडणुका सुरू असल्याने या समूहावर छापेमारी झाल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. मध्य भारतात सोम समूह हा मद्य व्यवसायातील मोठा समूह आहे. महाराष्ट्रात ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची मोठी घोषणा कंपनीने केली होती. कंपनी बीअर, व्हिस्की, वोडका, रम, जीन, देशी दारू आदी उत्पादने बनवते.