केईएम, टाटा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय दूर होणार

या परिसरात दोन्ही बाजुच्या फुटपाथवर कपड्याची दुकाने व रहिवासी वस्ती आहेत.
केईएम, टाटा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय दूर होणार

हिंदमाता-परळ परिसर जलमुक्त करण्यासाठी हिंदमाता-परळ पूल जोडण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या भागात पाणी न साचल्याने वाहनधारकांसह स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर परळच्या दोन्ही बाजुच्या ये जा करण्यासाठी पादचारी पूल बांधण्यात येणार असून सरकते जिन्यांची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी पालिका ४ कोटी ८७ लाख रुपये खर्च करणार असून केईएम, टाटा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे.

परळ भागात केईएम, टाटा, वाडिया ही मोठी रुग्णालये आहेत. तसेच या परिसरात दोन्ही बाजुच्या फुटपाथवर कपड्याची दुकाने व रहिवासी वस्ती आहेत. हिंदमाता, परळ परिसर जलमुक्त करण्यासाठी भूमिगत टाक्या बसवल्याने यंदाच्या पावसाळ्यात हिंदमाता परिसर पूरमुक्त झाल्याचे समाधान स्थानिक दुकानदार व नागरिकांनी व्यक्त केले आहे. मात्र दोन्ही पूल जोडण्यात आले, मात्र पादचाऱ्यांना परळ ब्रिजला किंवा हिंदमाता पुलाला वळसा घालून जावे लागते. पादचाऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी दोन्ही पुलांच्या सखल भाग असलेल्या ठिकाणी पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतल्याचे पालिकेच्या पूल विभागाचे मुख्य अभियंता सतीश ठोसर यांनी सांगितले.

हिंदमाता परळ परीसरात पावसाळ्यात ठप्प पडणाऱ्या वाहतुकीवर उपाय म्हणून महानगर पालिकेने दोन उड्डाण पुलात कनेक्टर तयार केला आहे. हा कनेक्टर १२ मीटर उंच आहे. यामुळे हा परिसर पूरमुक्त झाला असून वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच हिंदमाता व परळ उड्डाणपूल जोडल्याने वाहतूक कोंडीची समस्या दूर झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in