प्रवीण दरेकरांच्या अडचणीत वाढ मुंबै बँक बोगस मजूरप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल

प्रवीण दरेकरांच्या अडचणीत वाढ
मुंबै बँक बोगस मजूरप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल

प्रवीण दरेकर

मुंबै बँकेतील बोगस मजूरप्रकरणी भाजप नेते प्रवीण दरेकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात आम आदमी पक्षाने दोन महिन्यांपूर्वी तक्रार दाखल केली होती.

मजूर नसूनदेखील याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सुमारे २० वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप प्रवीण दरेकरांवर ठेवण्यात आला आहे. मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यामध्ये दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदेंच्या तक्रारीवरुन या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

१९९७ पासून मजूर

प्रवर्गातून संचालकपदी निवड

मुंबै बँकेची निवडणूक झाली त्यावेळी मजूर म्हणून प्रवीण दरेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला होता. या निवडणुकीमध्ये ते निवडून देखील आले होते. परंतु, सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले. दरेकर १९९७ पासून मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. मात्र, मजूर नसतानाही निवडणूक लढवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in