पावसाच्या संततधारेमुळे दोन महिन्यांच्या पाणीसाठ्यात वाढ

पुढील १५ दिवस असाच पाऊस बरसला तर लवकरच मुंबईकरांची पाणी कपातीतून सुटका होईल
पावसाच्या संततधारेमुळे दोन महिन्यांच्या पाणीसाठ्यात वाढ

जून महिन्यात पावसाने धरण क्षेत्रात हजेरी न लावल्याने मुंबईकरांना १० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. परंतु जून महिन्याच्या अखेरपासून वरुणराजाची कृपा झाली आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे गेल्या सहा दिवसांत तब्बल दोन महिन्यांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पावसाची संततधार कायम असल्याने सातही धरणात ६ जुलैपर्यंत २ लाख ३२ हजार ७४४ दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध झाला आहे. पुढील १५ दिवस असाच पाऊस बरसला तर लवकरच मुंबईकरांची पाणी कपातीतून सुटका होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला.

मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा अशा सात धरणांमधून दररोज ३८५० दशलक्ष लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र संपूर्ण जून महिना दडी मारलेल्या पावसाने आठवडाभरापासून जोरदार बरसायला सुरुवात मुंबईसाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजनाच्या दृष्टीने १ ऑक्टोबर रोजी सातही तलावात मिळून १४,४७,३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in