Mumbai AC Local : पश्चिम रेल्वेवर एसी लोकलला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद

२ ऑक्टोबर रोजी एकाच दिवसांत १८ हजारांहून अधिक तिकिटांची विक्री
Mumbai AC Local
Mumbai AC Local

पश्चिम रेल्वे मार्गावर १ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला. पश्चिम रेल्वेने प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन नव्या वेळापत्रकात आणखी ३१ वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र सामान्य लोकलच्या ३१ फेऱ्यांच्या बदल्यात वातानुकूलित लोकल चालवण्यात आल्या. प्रवाशांचा दिवसागणिक प्रतिसाद वाढला असून सध्या दररोज ७९ वातानुकूलित लोकल फेऱ्या होत आहेत. वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढल्याने तिकीट विक्रीतही वाढ झाली आहे.

१ सप्टेंबर रोजी १२ हजार ६६३, तर ३ सप्टेंबर रोजी १५ हजार ७८९ तिकीट विक्री झाली होती. तर याच महिन्यात साधारण एक ते दोन हजार पासची विक्री झाली होती. ऑक्टोबरमध्ये यात वाढ झाली असून २ ऑक्टोबर रोजी सर्वाधिक १८ हजार ६५८ तिकिटांची विक्री झाली आहे. १० आणि ११ ऑक्टोबर रोजी प्रत्येकी १७ हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in