व्यापाऱ्याच्या पत्नीचे मॉर्फ केलेले अश्‍लील फोटो व्हायरल

ही रक्कम दिली नाही तर त्यांच्या पत्नीचे अश्‍लील मॉर्फ केलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली
व्यापाऱ्याच्या पत्नीचे मॉर्फ केलेले अश्‍लील फोटो व्हायरल

मुंबई : व्यापाऱ्याच्या पत्नीचे मॉर्फ केलेले अश्‍लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून तिची बदनामी करून खंडणीसाठी धमकाविणाऱ्या एका आरोपीला कोलकाता येथून एल. टी मार्ग पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. अब्दुल रेहमान हसानुर मंडल असे या आरोपीचे नाव असून, अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने बुधवार २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईलसह सिमकार्ड जप्त केला आहे. यातील तक्रारदार व्यापारी काळबादेवी परिसरात राहतात. १२ मेला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करून त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. ही रक्कम दिली नाही तर त्यांच्या पत्नीचे अश्‍लील मॉर्फ केलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. काही वेळानंतर त्याने त्यांच्या पत्नीचे मॉर्फ केलेले अश्‍लील फोटो त्यांना व्हॉटअपवर पाठवून दिले होते. लवकरच पैसे पाठव नाहीतर त्याच्या मोबाईलमधील कॉन्टक्ट लिस्टमधील सर्व व्यक्तींना ते फोटो पाठवून देईन, अशी धमकीच त्याने दिली होती; मात्र त्यांनी त्याच्या धमक्यांना भीक घातली होती. त्यामुळे या व्यक्तीने त्यांच्या पत्नीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता

logo
marathi.freepressjournal.in