भारताने आशिया चषक आणि टी-२० विश्वचषक जिंकावा ; विराट कोहली

भारताने आशिया चषक आणि टी-२०  विश्वचषक जिंकावा ; विराट कोहली

भारताने आशिया चषक आणि टी-२० विश्वचषक जिंकावा, अशी माझी इच्छा आहे आणि माझ्यासाठी हेच प्रेरणादायी आहे. जिंकण्यासाठी मदत करणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट आहे,” असे क्रिकेटपटू विराट कोहलीने सांिगतले.

गुजरातविरुद्धच्या सामन्यात बंगळुरूने विजय मिळविल्यांनतर कोहली म्हणाला की, “मी धावा काढायला सुरू केले की, स्वत:लाच प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो. ते कसे करायचे, याची मला माहिती आहे.”

त्याने पुढे सांगितले की, “मला माझ्या फिटनेससाठी समतोल राखावा लागेल. विश्रांती घ्यावी लागेल. एकदा मी खेळण्याच्या मानसिकतेत आलो की, परत मागे वळून पाहणार नाही. आता भारताला आशिया चषक आणि टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी मदत करणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट राहील.”

यंदाच्या आयपीएलच्या हंगामातील ६७व्या सामन्यात गुणतालिकेत सर्वांत वर असलेल्या गुजरातचा बंगळुरू संघाने पराभव केला. या सामन्यात खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीने ७३ धावांची खेळी केली. त्यामुळे आरसीबीला आठ चेंडू राखून विजय मिळविता आला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in