भारतीय शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये झाली वाढ

राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी १५७.९५ अंक किंवा ०.९६ टक्का वाढून १६,६४१.८० वर बंद झाला
भारतीय शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये झाली वाढ

दोन दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात तेजी परतली. युरोपियन बाजारातील सकारात्मक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुमारे १ टक्का वाढ झाली. माहिती तंत्रज्ञान आणि बँकांच्या समभागांची जोरदार खरेदी झाल्याने बाजाराला बळ मिळाले. दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ५४७.८३ अंक किंवा ०.९९ टक्के वधारुन ५५,८१६.३२ वर बंद झाला. दिवसभरात तो ५८४.६अंक किंवा १ टक्के उसळून ५५,८५३.०९ ही कमाल पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी १५७.९५ अंक किंवा ०.९६ टक्का वाढून १६,६४१.८० वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत सन फार्माचा समभाग सर्वाधिक ३.३९ टक्के वाढला. तर त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, लार्सन ॲण्ड टुब्रो, एशियन पेंटस‌्, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स आणि इंडस‌्इंड बँक यांच्या समभागात वाढ झाली. तर भारती एअरटेल, कोटक महिंद्रा बँक, एनटीपीसी, बजाज फिनसर्व आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या समभागात १.३२ टक्के घसरण झाली. आशियाई बाजारात सेऊल, टोकियोमध्ये वाढ तर शांघायमध्ये घसरण झाली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in