इन्शुरन्स कंपन्यांनी २४०० कोटींचा जीएसटी बुडवला

मध्यस्थ कंपन्या विमा कंपन्यांच्या पुरवठादार म्हणून एजंटना कमिशन म्हणून पैसे देत होत्या
इन्शुरन्स कंपन्यांनी २४०० कोटींचा जीएसटी बुडवला

मुंबई : आयुर्विमा व सर्वसाधारण विमा कंपन्या बजाज अलायन्स, आदित्य बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स यांच्यासह काही सरकारी विमा कंपन्यांनी २४०० कोटी रुपयांचा ‘जीएसटी’ बुडवल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

विमा कंपन्यांचीही चौकशी सुरू केली आहे, ज्या प्राप्तिकर मूल्यांकनातूनही सुटल्या होत्या. १५ विमा कंपन्यांची यादी जीएसटी गुप्तचर महासंचालकांनी बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट्सचा दावा केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ज्यात मध्यस्थांना पैसे दिल्याच्या चौकशीनंतर निष्कर्ष काढण्यात आला आहे. या प्रकरणात परवानगीचे उल्लंघन करून कमिशन एजंटना देण्यात आले होते. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या नियम आणि नियमांमध्ये विहित केलेल्या मर्यादांचे उल्लंघन झाले होते.

या मध्यस्थ कंपन्या विमा कंपन्यांच्या पुरवठादार म्हणून एजंटना कमिशन म्हणून पैसे देत होत्या. सेवा घेतल्याबद्दलची पुरेशी कागदपत्रे देण्यास असमर्थ असलेल्या मध्यस्थाने प्राप्तिकर कायद्याच्‍या कलम ‘१४८ अ’ अन्वये परवानगी नाकारली. बोगस खरेदीबाबत छाननी सुरू केली.

जीएसटी गुप्तचर महासंचालकांच्या तपासात आढळले की, या विमा कंपन्यांनी आयडीआरआयएने निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक कमिशन कॉर्पोरेट एजंटना दिले. मार्केटिंग व ब्रँड ॲॅक्टिव्हेशनच्या नावाखाली हे देण्यात आले.

एचडीएफसी लाईफ इन्शुरन्सला ९४२ कोटी रुपये, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ४९२ कोटी रुपये भरण्याची नोटीस आली आहे. त्यात एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनीने २५० कोटी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियलने १९० कोटी रुपये जीएसटी गुप्तचर महासंचालकांकडे जमा केले आहेत. यापूर्वी काही कंपन्यांकडे जीएसटीची थकबाकी होती त्यांना नोटीस देताच ७०० कोटी रुपये वसूल झाले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in