
भारतीय नागरी सेवांमध्ये १० लाख युवकांना समाविष्ट करून घेण्याच्या मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी रोजगार मेळाव्याने झाला. भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये ७५ हजार युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल रोजगार मेळाव्याच्या मुंबईतील कार्यक्रमात सहभागी झाले. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात एकूण ३९५ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
नवीन भरती झालेल्यांना टपाल विभाग, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, तटरक्षक दल, सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय, भारतीय नौदल, सीआयएसएफ, आरसीएफ, माझगाव डॉक्स लिमिटेड,प्राप्तिकर सीबीआय सी सेंट्रल बँक ऑफ इंडिया अशा विविध ठिकाणी नियुक्ती मिळाल्या आहेत युनियन बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक कोकण ग्रामीण बँक कॅनरा बँक एन बी सी सी आणि सिमेन्स प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन मुंबई आयआयटी मुंबई एनआयएफटी आणि बीएसएफ या कार्यालयांमध्ये नव्या उमेदवारांची नियुक्ती केली आहे नागपूर येथील कार्यक्रमात २१३ युवकांना नियुक्ती पत्र देण्यात आली आहेत.
पंतप्रधान काय म्हणाले?
आज भारत ही पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. गेल्या आठ वर्षांतील सुधारणांमुळे हे ध्येय साध्य करता आले.
स्किल इंडिया अभियानांतर्गत देशभरातील १.२५ कोटी युवकांना प्रशिक्षण मिळाले आहे. त्याचप्रमाणे शेकडोंनी उच्च शिक्षण संस्था उघडल्या गेल्या आहेत.
ड्रोन धोरण मुक्त करण्यासाठी घेतलेला पुढाकार, अंतराळ धोरण मुक्त ठेवणे. रोजगार मुद्रा योजनेअंतर्गत २० लाख कोटी रुपयांच्या कर्जांचे वितरण अशा गोष्टींमुळे ही प्रक्रिया अधिक गतिमान झाली आहे.
देशात पहिल्यांदाच खादी आणि ग्रामीण उद्योगांनी चार लाख कोटींचा आकडा पार केला आणि चार कोटींपेक्षा अधिक रोजगार या खादी आणि ग्रामोद्योगमध्ये निर्माण झाले आहेत.
स्वातंत्र्याची ७५ वर्षे लक्षात घेऊन केंद्र सरकार या एका कार्यक्रमांतर्गत ७५ हजार तरुणांना नियुक्तीपत्र देत आहे. अनेक एनडीएशासित आणि भाजपशासित राज्यांसह केंद्रशासित प्रदेशही यापुढे अशाच प्रकारचे मेळे आयोजित करतील.
- नरेंद्र मोदी