रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी 'गेट वेल सून’ मोहीमेचा आरंभ

कोल्डमिक्स वापरून भरलेल्या खड्ड्यांमधील रस्ते शोधण्याची पाळी मुंबईकरांवर आली.
 रस्त्यांवरील  खड्ड्यांसाठी 'गेट वेल सून’ मोहीमेचा आरंभ

पहिल्याच पावसात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली. आणि मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने मुंबईतील रस्त्यांची चाळण झाली. नव्याने बनवलेल्या रस्त्यांसह काँक्रीटचे रस्ते ही उखडले आहेत. तर कोल्डमिक्स वापरून भरलेल्या खड्ड्यांमधील रस्ते शोधण्याची पाळी मुंबईकरांवर आली. कोल्ड्मिक्सच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येउ लागले. तर यासाठी रस्त्यांचे ठेकेदार जबाबदार असून पालिका प्रशासनाने त्यांच्यावर ठोस कारवाई करावी अशा मागणी सह अनेक सामाजिक संघटना एकत्रित येउन त्यांनी रस्त्यातील खड्ड्यांसाठी ‘गेट वेल सून’ मोहीम राबवली आहे. यात पालिकेला पोस्ट कार्ड पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

आयुक्तांना पाठवली ५०० पोस्ट कार्ड : आता तरी होणार का रस्त्यामध्ये सुधारणा ?

भ्रष्ट ठेकेदारांवर कारवाई करावी यासाठी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पोस्ट कार्ड पाठवण्यात येणार आहेत. या पोस्ट कार्डवर नागरीकांकडून 'गेट वेल सून' असा संदेश लिहिला जाणार आहे. आयुक्तांना ५०० कार्ड पाठवून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. प्रशासन दखल घेईपर्यंत पोस्ट कार्ड मोहीम राबवण्यात येणार असून महिन्याभरात १० हजार पोस्ट कार्ड पाठवण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in