मुंबा इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे लोगोचे लॉन्च

मुंबा इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे लोगोचे लॉन्च

पहिला मुंबा इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल जानेवारी २०२३ मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यात ‘जागतिक सिनेमा ते मराठी सिनेमा’ असे एकूण सहा विभाग असतील. मुंबा इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे (MIIFF) संस्थापक शेरॉन प्रभाकर, सुधीर अट्टावर, त्रिविक्रम बेलथंगडी, संदीप सोपरकर आणि चैताली चॅटर्जी यांनी या चित्रपट महोत्सवाचा लोगो शुक्रवारी लॉन्च केला.

यावेळी सुधीर अट्टावार म्हणाले की, “या चित्रपट महोत्सवात सहा विभाग आहेत. पहिली श्रेणी जागतिक सिनेमाची आहे, दुसरी श्रेणी एलजीबीटी समुदायाची आहे, एक श्रेणी महिला चित्रपट निर्मात्यांची आहे. एक श्रेणी फिल्म इन्स्टिट्यूटसाठी आहे. पाचवी श्रेणी जाहिरातपटांसाठी असेल आणि सहावी श्रेणी मराठी चित्रपटांसाठी असेल. नृत्य आणि संगीतावर आधारित चित्रपटांसाठी एक विभाग असेल. या महोत्सवासाठी नोंदणी जुलै २०२२ पासून सुरू होईल.”

“२२ वर्षांपूर्वी जेव्हा मी मुंबईत आलो, तेव्हा दुसऱ्या दिवशी मी मुंबादेवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो आणि मी तिला म्हणालो की, या शहराचे नाव तुझ्या नावावर आहे, असा दिवस कधी येईल जेव्हा मी तुझ्या नावाशी जोडू शकेन. आज २२ वर्षांनंतर मला मुंबा इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलशी जोडून खूप आनंद होत आहे,” असे कोरिओग्राफर संदीप सोपरकर म्हणाले. तर या प्रकल्पाद्वारे नवीन चित्रपट निर्मात्यांसाठी दरवाजे उघडतील. त्यामुळे या प्रवासाबद्दल आपण फार उत्सुक असल्याचे त्रिविक्रम बेलथंगडी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in