कान चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ तयार

कान चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ तयार

फ्रान्समधील कान चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे शिष्टमंडळ शुक्रवारी कान येथे पोहोचत आहे.

या शिष्टमंडळात सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे महाव्यवस्थपकीय संचालक विवेक भिमनवार, समन्वयक अशोक राणे, मनोज कदम तसेच या महोत्सवासाठी निवड करण्यात आलेल्या ‘कारखानीसांची वारी’, ‘पोटरा’ आणि ‘तिचं शहर होणं’ या मराठी चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक अर्चना बोरहाडे, मंगेश जोशी, शंकर धोत्रे, समीर थोरात, सिध्दार्थ मिश्रा, रसिका आगाशे याही सहभागी होत आहेत. १८ मेपासून सुरु झालेला हा चित्रपट महोत्सव येत्या २८ मेपर्यंत असणार आहे. जागतिक स्तरावरील चित्रपट निर्मिती आणि या क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांचा मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते यांना अनुभव घेता यावा आणि मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचावा, यादृष्टीने या शिष्टमंडळात यांचा समावेश करण्यात आला आहे. या महोत्सवातील इंडिया पॉवेलीयनमध्ये चित्रपट महोत्सवाच्या काळात सुरू असणाऱ्या चर्चासत्र आणि परस्पर संवादांच्या उपक्रमात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख आणि सचिव सौरभ विजय हे सहभागी

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in