
गुरूवारी(28 सप्टेंबर) गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनाच्या दिवशी मुंबई शहर आणि उपनगरातील महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले आहे. विसर्जनानिमित्त मुंबईतील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे. राज्यभरात गेल्या १० दिवसांपासून गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे. उद्या हा उत्सव थंडावणार आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी मुंबईत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच बरोबर वाहतुकीत देखील मोठा बदल करण्यात आला आहे. मुंबईतील अनेक महत्वाचे रस्ते उद्या बंद ठेवण्यात आले आहेत.
मुंबईतील गणेशोत्सव राज्यासह देशभरात प्रसिद्ध आहे. देश तसेच परदेशातून अनेक नागरिक याठिकाणचा उत्सव बघण्यासाठी येत असतात. गणपती विसर्जनाच्या दिवशी मुंबईत होणारी गर्दी लक्षात घेता, मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याच बरोबर मुंबईत वाहतुकीत देखील मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिका, पोलिस, वाहतूक शाखेने विसर्जनाचे चोख नियोजन केले असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबई शहहासह उपनगरात देखील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. चौपाट्या, तलाव याा ठिकाणी पालिकेने विसर्जनाची चोख तयारी केली असून अनेक ठिकाणी फिरते हौद तसंच कुंड तयार करण्यात आले आहे.
वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग
नाथालाल पारेख मार्ग
कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग
रामभाऊ साळगावकर मार्ग
सीएसएमटी जंक्शन ते मेट्रो जंक्शन
जे. एस. एस. रोड
विठ्ठलभाई पटेल मार्ग
बाबासाहेब जयकर मार्ग
राजाराम मोहन रॉय मार्ग
कावसजी पटेल टँक रोड
संत सेना मार्ग
नानुभाऊ देसाई रोड
सरदार वल्लभभाई पटेल रोड
दादासाहेब भडकमकर मार्ग
सरदार वल्लभभाई पटेल मार्ग
वाळकेश्वर रस्ता
पंडिता रमाबाई मार्ग
जगन्नाथ शंकरशेठ मार्ग
एम.एस.अली मार्ग
पठ्ठे बापूराव मार्ग
ताडदेव मार्ग
जहांगीर बोमण बेहराम मार्ग
एन. एम. जोशी मार्ग
बी. जे मार्ग, मिर्झा गालीब मार्ग
मौलाना आझाद रोड
बेलासिस रोड
मौलाना शौकत अली रोड
डॉ. बी. ए. रोड
चिंचपोकळी जंक्शन ते गॅस कंपनी
भोईवाडा नाका ते हिंदमाता जंक्शन
केईएम रोड, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग
रानडे रोड, संत ज्ञानेश्वर मंदिर रोड
जांभेकर महाराज मार्ग
केळूस्कर रोड दक्षिण मार्ग
टिळक उड्डाण पूल
६० फिट रोड
माहिम सायन लिंक रोड
टी. एच. कटारिया मार्ग
माटुंगा लेबर कॅम्प रोड
एल. बी. एस. रस्ता
न्यु मिल रोड
संत रोहिदास मार्ग