Manish Sisodia : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीयांना अटक; मुंबईतही उमटले पडसाद

मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदीयांना (Manish Sisodia) सीबीआयने अटक केली असून त्यांची चौकशी सुरु
Manish Sisodia : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीयांना अटक; मुंबईतही उमटले पडसाद

राजधानी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. मद्य घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून त्यांची ८ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना सीबीआयने ताब्यात घेतले. यामुळे देशभरात खळबळ उडाली असून याचे पडसाद आता महाराष्ट्रही दिसू लागले आहेत. देशभर आप पक्ष आक्रमक झाला असून मुंबईतही आपकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी मुंबई पोलिसांनी आपच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली.

नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. दिल्लीत उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने सुरु केलेले नवे मद्य धोरण हे त्यांच्या अटकेचे कारण असल्याचे सांगितले जात आहेत. या धोरणावरुन मनीष सिसोदिया यांची यापूर्वीही अनेकदा चौकशी झालेली आहे. त्यानंतर सीबीआयने उपमुख्यमंत्री सिसोदिया चौकशीत सहकार्य करत नसल्याचे कारण दिले आणि त्यांना अटक केली.

दरम्यान, मागच्या वर्षी जुलैमध्ये दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याकडे एक अहवाल सादर केला होता. या अहवालामध्ये मनीष सिसोदियांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. मद्य परवाना देताना त्याऐवजी कमिशन घेतले गेले. त्यानंतर हा पैसे आपने पंजाब विधानसभा निवडणुकीत वापरला, असा गंभीर आरोप मनीष सिसोदियांवर करण्यात आला. यानंतर ईडी आणि सीबीआयने प्रकारांची चौकशी करण्यात सुरुवात केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in