मराठी हृदयापर्यंत पोहोचणारी भाषा : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

‘मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनात आयोजित परिसंवादात गुरुवारी ते बोलत होते.
मराठी हृदयापर्यंत पोहोचणारी भाषा : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मराठी भाषा ही जगातील सर्वाधिक मौल्यवान भाषा आहे. सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी ही संस्कारांची भाषा जनाजनाच्या मनामनात पोहोचविण्यासाठी हे विश्व मराठी संमेलन अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया, वरळी येथे आयोजित ‘मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनात आयोजित परिसंवादात गुरुवारी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पत्रकार अतुल कुलकर्णी, निलेश खरे, प्रसन्न जोशी, अभिजित कांबळे, निवेदक अजित चव्हाण उपस्थित होते. मुनगंटीवार म्हणाले, ‘‘मी महाराष्ट्रीय असल्याचा मला अभिमान आहे. मराठी भाषेने जन्माला घातलेली विरासत ही जगातील दहा प्रमुख विरासतींपैकी एक आहे. विश्व मराठी संमेलन हे मराठी भाषा सर्वदूर पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. यनिमित्ताने मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित होईल, असेही त्यांनी सांगितले.

शिक्षणात मराठीचा वापर वाढविणार-चंद्रकांत पाटील

राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी तांत्रिक विषयांचे मराठीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मराठी विश्व संमेलनात शुभेच्छा देतांना ते बोलत होते. ‘‘राज्य शासन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रभावी पाऊले उचलत आहे. शासकीय कामकाज मराठीतूनच व्हावे, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्याचप्रमाणे संशोधनासारखा विषय मातृभाषेतून शिकविण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच विधी विषयक कामकाज मराठीतून व्हावे यासाठी कायदेविषयक शिक्षण मराठी भाषेतून देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in