परदेशातून दक्षिणेकडील राज्यात सामूहिक तस्करी वाढली

शारजाहून कोईम्बूरला आलेल्या विमानातून ५.१७ किलो सोने पकडले
परदेशातून दक्षिणेकडील राज्यात सामूहिक तस्करी वाढली

मुंबई : मुंबई, दिल्ली विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक झाल्याने परदेशातून दक्षिणेकडील राज्यात सामूहिक तस्करी वाढल्याचे आढळून आले आहे. ओमानहून चेन्नईला आलेल्या १५६ पैकी १४९ प्रवाशांना महसूल गुप्तचर महासंचालनालयाने (डीआरआय) पकडले आहे. त्यांच्याकडून १३ किलो सोने, २५०० स्मार्ट फोन, केशर आदी १४ कोटी रुपयांचा माल जप्त केला आहे. मोठी कस्टम ड्युटी चुकविण्यासाठी सामूहिक तस्करीचा घाट घालण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

संघटित गुन्हेगारांनी मध्य पूर्वेतील देशातून दक्षिण भारतातील विमानतळावर मोर्चा वळवला आहे. चेन्नई, कोचीन, हैदराबाद येथे मोठ्या प्रमाणावर तस्करी होत आहे. गेल्या तीन महिन्यांत या विमानतळावर मोठ्या प्रमाणात तस्करीचे सोने पकडले आहे. हे संघटित गुन्हेगार आखातातील कामगारांना हाताशी धरून ही तस्करी करत आहेत. त्यांच्यामार्फत सोने व अन्य प्रतिबंधित वस्तू भारतात पाठवत आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, दिल्लीत सोन्याचे रॅकेट पकडल्याने संघटित गुन्हेगारांनी तामिळनाडूकडे मोर्चा वळवला, अशी माहिती सीमाशुल्क व महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सोन्याच्या तस्करीला आळा घालण्याचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत. चेन्नईच्या डीआरआयने १६३ किलो सोने जप्त केले असून त्याची किंमत ९७ कोटी आहे. जानेवारी २०२३ पासून आतापर्यंत ४३ जणांना तामिळनाडूच्या विविध भागात अटक केली आहे. यंदाच्या मेमध्ये डीआरआयने दोन प्रवाशांकडून २३.३४ किलो सोने जप्त केले. त्याची किंमत १४.४३ कोटी रुपये आहे, तर श्रीलंकेतून थंगाचीमदम येथे समुद्रमार्गे आलेले २०.५ किलो सोने डीआरआयने पकडले. त्याची किंमत १२ कोटी रुपये आहे, तर चेन्नईत ५.१७ किलो सोने पकडले. त्याची किंमत ३.१७ कोटी रुपये होती. तसेच शारजाहून कोईम्बूरला आलेल्या विमानातून ५.१७ किलो सोने पकडले. त्याची किंमत ३.१७ कोटी रुपये होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in