अंधेरी पुर्वेतील एमआयडीसीत भीषण आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
अंधेरी पुर्वेतील एमआयडीसीत भीषण आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

मुंबईच्या अंधेरीतील (पुर्व) एमआयडीसी सिप्झ सेंट्रल रोजवरील एका इमारतीला आज (1 जून) आग लागल्याची घटना घडली आहे. या बहुमजली इमारतीच्या तळघराच्या काही भागाला ही आग लागली. याठिकाणी पुठ्ठा साठा आणि इतर संग्रहित साहित्य असल्याने आग अधिकाधीक भडकू लागली. घटनेनंतर तात्काळ मुंबईच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एमआयडीसीमधील एक आणि मुंबई अग्निशमन दलाच्या चार अशा पाच लहान होज लाईन्सकडून सक्रियपणे आग विझवण्याचं काम सुरु होतं. यावेळी अग्निशमन दलाच्या मदतीसाठी बारा मोटर पंप तैनात करण्यात आले होते. यावेळी अग्नीशमन दलाच्या जवानांनी तळघरात प्रवेश करण्यासाठी आणि आग विझवण्यासाठी प्लोअरिंग तोडण्याचं काम केलं. या आगीती तीव्रता पाहाता. या घटनेचं वर्णन ऑपरेशन स्तर 3 म्हणून वर्गीकरण करण्यात आलं आहे. स्तर तीन हा आगीच्या उच्च पातळीची तीव्रता दर्शवतो.

या घटनेदम्यान धुराचे मोठे लोळ असल्याने दोन सुरक्षा रक्षक दुसऱ्या मजल्यावर अडकून पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अँगस शिडीच्या वापराने सुरक्षेची काळजी घेत त्यांनी सुखरुप सुटका केली.

या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी मुंबई अग्नीशमन दलासह एनेक एजन्सी जमा झाल्या होत्या. परिस्थिती नियंक्षणात आणण्यासाठी एकून 12 फायर इंजिन, 8 जंबो टँकर, 1 एरियल वॉटर टॉवर टेंडर, 2 श्वास उपकरण व्हॅन, 1 द्रुत प्रतिसाद वाहन, 2 रेस्क्यू व्हॅन, 1 कंट्रोल पोस्ट आणि 1 फिटर तैनात करण्यात आलं होतं. तसंच एक सहाय्यक अभियंता, एक कनिष्ठ अभियंता आणि 11 मजूर यांची देखील घटनास्थळी उपस्थिती होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीविहानी झाली नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in