ठाकरे कुटुंबातील 'ती' व्यक्ती एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

या भेटीमुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा झडली आहे.
 ठाकरे कुटुंबातील 'ती' व्यक्ती एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. या फुटीचे लोण ठाकरे घराण्यात पोहोचल्याचे दिसत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सून स्मिता ठाकरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बंडानंतर एकनाथ शिंदे यांची भेट घेणाऱ्या ठाकरे कुटुंबातील त्या पहिल्याच व्यक्ती आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा झडली आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या भावजय स्मिता ठाकरे यांच्यात फारसे सख्य नाही; पण बाळासाहेब हयात असताना १९९५ला युतीच्या राजवटीत त्यांचा प्रचंड दबदबा होता; मात्र गेली अनेक वर्षे त्या राजकारणापासून दूर होत्या; मात्र त्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे घराण्यातील एक असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा व्यक्त केला असला, तरीदेखील त्यांनी अद्याप एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली नाही. हे पाहता बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांची भेट घेणाऱ्या स्मिता ठाकरे या ठाकरे घराण्यातील पहिल्याच व्यक्ती आहेत. त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर स्मिता ठाकरे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी गराडा घातला. त्यांना भेटीबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, “एकनाथ शिंदे आमचे जुने शिवसैनिक आहेत आणि आज ते मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. मी त्यांना खूप वर्षांपासून ओळखते. त्यांचा मी आदर करते. त्यांनी शिवसेनेत किती कार्य केलेले आहे ते मला माहीत आहे.”

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in