Mega Block रविवारी प्रवास करताय ? मेगाब्लॉक कुठे, कसा जाणून घ्या

या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन दिशेच्या काही उपनगरीय गाड्या रद्द राहणार आहेत. तर मध्य रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर...
Mega Block रविवारी प्रवास करताय ? मेगाब्लॉक कुठे, कसा जाणून घ्या

रेल्वे रूळ, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी उपनगरीय रेल्वे मार्गावर रविवार २२ जानेवारी रोजी चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान १०.३५ ते १५.३५ पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गांवर तसेच मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्गांवर अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक नसल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सकाळी १०.३५ ते १५.३५ पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. या कालावधीत सर्व जलद मार्गावरील गाड्या धिम्या मार्गावर चालवल्या जातील. या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन दिशेच्या काही उपनगरीय गाड्या रद्द राहणार आहेत. तर मध्य रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक असणार आहे. यामध्ये ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत. तर हार्बर मार्गावर सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे - सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत ब्लॉक असणार आहे. यामध्ये सीएसएमटी मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in