Mumbai : मानसिक आरोग्याच्या मनमोकळ्या संवादाला चालना; पालिकेच्या सहकार्याने 'रिस्टार्ट' चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबईतील राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय (नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट) या उपक्रम अंतर्गत 'रिस्टार्ट' या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन नुकतेच आयोजित करण्यात आले.
Mumbai : मानसिक आरोग्याच्या मनमोकळ्या संवादाला चालना; पालिकेच्या सहकार्याने 'रिस्टार्ट' चित्रपटाचे विशेष प्रदर्शन
Mumbai : मानसिक आरोग्याच्या मनमोकळ्या संवादाला चालना; पालिकेच्या सहकार्याने 'रिस्टार्ट' चित्रपटाचे विशेष प्रदर्शन(Photo-Instagram)
Published on

मुंबई : केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबईतील राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय (नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट) या उपक्रम अंतर्गत 'रिस्टार्ट' या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन नुकतेच आयोजित करण्यात आले.

दिग्दर्शक इक्बाल रिजवी दिग्दर्शित 'रिस्टार्ट' हा चित्रपट आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य या संवेदनशील विषयावर आधारित आहे. दुःख,अपराधीपण, असहाय्यता आणि आशा यांसारख्या भावनिक पैलूंना स्पर्श करत समाजात मानसिक आरोग्याविषयी मोकळेपणाने संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

मुंबईतील राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय येथे चित्रपट प्रदर्शनानंतर 'फ्रेमिंग कॉन्सरव्हेशन्स अराऊंड द अनस्पोकन' या विषयावर विशेष परिसंवाद आणि प्रश्नोत्तर सत्र आयोजित करण्यात आले.

या परिसंवादात दिग्दर्शक व निर्माते इक्बाल रिजवी, कलाकार राहुल सिंह, आश्लेषा वशिष्ठ, अद्रीजा शर्मा, डॉ. सोनल दीक्षित तसेच लेखक अंकुर मित्तल यांनी सहभाग घेतला. चित्रपटाचा आशय, मानसिक आरोग्य जागरूकतेची गरज व समाजातील संवादाचे महत्त्व यावर मान्यवरांनी विचार मांडले.

सकारात्मक जागरूकतेच्या दिशेने वाटचाल

या उपक्रमातून सामाजिक परिवर्तनासाठी चित्रपट आणि कलामाध्यमांची प्रभावी भूमिका अधोरेखित झाली. कला, संस्कृती आणि संवादाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक जागरूकता निर्माण करण्याच्या दिशेने राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय आणि महापालिका यांची बांधिलकी या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आली. बृहन्मुंबई महापालिकेच्या व्यवसाय विकास विभागप्रमुख डॉ. शशी बाला यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कलाकार, प्रेक्षक उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in