Raj Thackeray : चेटूक म्हणजे काय? मनसेने शेअर केला राज ठाकरेंच्या भाषणाचा व्हिडीओ

जादूटोणा, चेटूक यावर भाष्य करणारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला
Raj Thackeray : चेटूक म्हणजे काय? मनसेने शेअर केला राज ठाकरेंच्या भाषणाचा व्हिडीओ
ANI

नुकतेच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सामनातील अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला जादूटोणा सरकार असा टोला लगावला होता. यावेळी यामधून महाविकास आघाडीतील नेत्यांच्या होणाऱ्या अपघातांचादेखील संदर्भ जोडला होता. यानंतर आज मनसेने (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी जादूटोणा, चेटूक यावर भाष्य करताना प्रबोधकर ठाकरेंचा एक किस्सा देखील सांगितला.

संबंधित व्हिडीओमध्ये राज ठाकरे म्हणतात की, 'कोणीतरी म्हंटल की जादूटोणा करतात. म्हणजे नक्की काय करतात?' असे म्हणताच जनतेमध्ये हशा पिकला. पुढे ते म्हणाले की, "कसलं चेटूक फेटून घेऊन बसलात. आपण कुठल्या जमण्यात आहोत, आणि आपण काय बोलतो? असं काय असत का कधी काही? परमेश्वराला मानलेच पाहिजे, पण हे चेटूक फेटूक असे काहीही नसते. फक्त आत्मविश्वासाने काम करा." असे मत राज ठाकरे यांनी एका सभेदरम्यान व्यक्त केले. यावेळी त्यांनी आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी कशा प्रकारे अंधश्रद्धा, तसेच अघोरी प्रथेचा नेहमी विरोध केला? तसेच, लोकांना भरीस पाडणाऱ्या या अघोरी प्रथेच्या विरोधात ते कायम उभे राहिले, याच संदर्भातील एक किस्सादेखील सांगितला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in