मतदार यादीला मोबाईल क्रमांकाची जोड मिळणार, २० ऑगस्टपर्यंत दुरूस्ती करता येणार

मुंबईतील मतदारांना २० ऑगस्टपर्यंत मतदार यादीसोबत मोबाईल क्रमांक जोडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या विविध सूचना आणि माहिती नागरिकांना मोबाईलवर मिळणे शक्य होणार आहे.
मतदार यादीला मोबाईल क्रमांकाची जोड मिळणार, २० ऑगस्टपर्यंत दुरूस्ती करता येणार
प्रातिनिधीक फोटो
Published on

मुंबई : मुंबईतील मतदारांना २० ऑगस्टपर्यंत मतदार यादीसोबत मोबाईल क्रमांक जोडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या विविध सूचना आणि माहिती नागरिकांना मोबाईलवर मिळणे शक्य होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दुसऱ्या विशेष संक्षित पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. कार्यक्रमअंतर्गत पात्र नव मतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील तपशीलामध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करण्याची संधीदेखील उपलब्ध आहे. यापैकी एक महत्वाची बाब म्हणजे यादीला मोबाईल क्रमांक जोडून घेणे ही होय. निवडणूक आयोगाकडून पाठवण्यात येणाऱ्या माहितीमध्ये मतदान केंद्र, मतदानाची तारीख, मतदानाची वेळ इत्यादी महत्वाची माहिती समाविष्ट असते. निवडणूक आयोगाच्या वतीने राबवले जाणारे उपक्रम, मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्या संदर्भातील अर्जावरील कार्यवाही सुलभ होते.

मोबाईल क्रमांक जोडण्याचे फायदे

नव मतदार नोंदणीचा अर्ज भरताना आपल्याला अर्जात स्वतःचा मोबाईल क्रमांक देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. इतर कोणत्याही मतदार ओळखपत्रासाठी वापरला न गेलेल्या स्वतःचा असा मोबाईल क्रमांक दिल तर तो मतदार यादीत आपल्या नावासोबत जोडला जातो.

logo
marathi.freepressjournal.in