हरकती सूचना पाठवण्याचा सोमवार अखेरचा दिवस

हरकती सूचना पाठवण्याचा सोमवार अखेरचा दिवस

प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर हरकती सूचना पाठवण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले होते. १ ते ६ जूनपर्यंत हरकती सूचना पाठवा, पालिकेच्या आवाहनाला अल्प प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत फक्त २० हरकती सूचना प्राप्त झाल्या आहेत. तर हरकती सूचना पाठवण्याचा सोमवार अखेरचा दिवस असल्याने आणखी हरकती सूचना येतील, असा विश्वास पालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पालिका प्रभाग आरक्षणाची सोडत ३१ मेपर्यंत काढण्यात आली. या सोडतीवर १ जून ते ६ जूनपर्यंत हरकती, सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यानुसार पहिल्याच दिवशी फक्त तीन हरकती नोंद झाल्या. त्यानंतरच्या तीन-चार दिवसांतही अपेक्षेप्रमाणे हरकती नोंद झालेल्या नाहीत; मात्र सोमवारी शेवटच्या दिवशी ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत किती हरकती, कोणत्या प्रकारच्या हरकती सूचना येतात, हे स्पष्ट होणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in