
सामान्य लोकलमधील फर्स्ट क्लासचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने घेतला. यानंतर फर्स्ट क्लास मधून प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येत वाढ होत आहे. १८ मेपर्यंत दररोज जवळपास ६ हजार ८९५ तिकीट विक्री होत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. यामुळे एसी लोकलसोबत फर्स्ट क्लासच्या तिकीट विक्रीत देखील वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
वाढती मागणी लक्षात घेत ऐन उन्हाळ्याच्या दिवसात रेल्वे प्रशासनाने एसी लोकलच्या तिकीट दरात ५ मे पासून ५० टक्केपर्यंत कपात केली. यापाठोपाठ सामान्य लोकलमधील फर्स्ट क्लासच्या तिकीट दरातही कपात करण्यात आली. हा निर्णय होताच प्रवाशांनी एसी लोकल आणि सामान्य लोकलच्या फर्स्ट क्लासमधून प्रवास करण्यास सर्वाधिक पसंती दिली.