Mumbai : थांब्यावरून रिकाम्या बस नेण्याचा प्रकार सुरूच; बेजबाबदार बसचालकांवर कारवाईची प्रवाशांकडून मागणी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील हाकेच्या अंतरावर असलेल्या बस थांब्यावर प्रवाशांना न घेता, रिकामी बस नेण्याचा प्रकार मागील कित्येक दिवस सुरु आहे. परिणामी प्रवाशांकडून बस थांब्यावरील वाहकांना धारेवर धरले जात आहे. त्यामुळे वाहकांकडून बेस्ट बसला भर रस्त्यावर अडवून प्रवाशांना बसविले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे अशा बेजबाबदार बसचालकांवर कारवाईची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील हाकेच्या अंतरावर असलेल्या बस थांब्यावर प्रवाशांना न घेता, रिकामी बस नेण्याचा प्रकार मागील कित्येक दिवस सुरु आहे. परिणामी प्रवाशांकडून बस थांब्यावरील वाहकांना धारेवर धरले जात आहे. त्यामुळे वाहकांकडून बेस्ट बसला भर रस्त्यावर अडवून प्रवाशांना बसविले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे अशा बेजबाबदार बसचालकांवर कारवाईची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

आर्थिक अडचणीत असलेल्या बस प्रशासनाला उभारणी देण्याचा प्रयत्न सुरू असताना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील खादी भंडार, स्टर्लिंग बुक हाऊसलगत असलेल्या बस थांब्यावर प्रवासी न घेता, चालक बसगाड्या सुसाट पळवित असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे प्रवाशांना एका बससाठी तासन‌्तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. याकडे बेस्ट प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी उपस्थित वाहकांकडुन करण्यात आली. सदर बस थांब्यावरून चर्चगेट स्टेशन, मंत्रालय, नरिमन पाॅईंट, फ्री प्रेस, बॅकबे डेपोसह इतर मार्गांवर धावतात, मात्र कंत्राटी बेस्टचालक बस थांब्यावर न थांबविता, रिकाम्या घेऊन जातात. यामुळे प्रवाशांच्या रोषाला उपस्थित वाहकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रवाशांची गर्दी झाल्यानंतर वाहक रस्त्यावर गाडीसमोर येऊन ती अडविण्याचा प्रयत्न करतो.

इतर डेपोतील बसचालकांचीही मनमानी

बॅकबे डेपोसह इतर डेपोतील बसचालक गाड्यांमध्ये प्रवासी न बसविता रिकाम्या घेऊन जातात. चाकरमानी कामाहून सुटण्याच्यावेळी असा प्रकार घडत असल्याने त्यांचे हाल होत असल्याचे वाहकाने नाव न घेण्याच्या अटीवर `नवशक्ति`ला सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in